वारजे, ता. 23 : वारजेतील सर्वात मोठी सोसायटी असलेली पॉप्युलर गिरीधर नगर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व नवीन सदस्य निवडून आले आहेत. रविवारी (ता.२३) यासाठी मतदान झाले होते.
या निवडणुकीत अनेक दिग्गजाना फटका बसला आहे. सर्वसाधारण गटातून संदीप पारखी, दिनेश भिलारे, रविंद्र सुतार, महादेव पवार, बाबुराव दोडके, विजय देसाई यांनी बाजी मारली. तर राखीव गटातून आशिष क्षिरसागर, संतोष ढाकणे व निळकंठ शिंदे यांनी आपआपल्या गटातून निवडणूक जिंकली. महिला गटातून भावना पाटील व विजया डुंबरे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन साळुंके यांनी जाहीर केले. नरेंद्र धोंडे, अभिषेक यादव यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर उमेदवार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब देशमुख, अभय शेटे व सागर भायगुडे यांनी काम पाहिले.
पूर्वी तीन सदस्यीय असलेली कार्यकारिणी यावेळी वाढवून अकरा सदस्यांची करण्यात आली होती. पॅनल पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे पाच व विकास पॅनल चे चार सदस्य निवडून आले. यातील परिवर्तन पॅनल कडेच आता सोसायटीचे सूत्र असले तरी सर्वांना एकत्र घेऊन सोसायटीचा विकास करणार असल्याचे आशिष क्षीरसागर व संदीप पारखी यांनी सांगितले.

अत्यंत चुरशीची निवडणूक:-
सुमारे ५० इमारती असलेल्या या सोसायटीत प्रत्येक इमारतीला एक या प्रमाणे ५३ मतदार होते. यातील सामान्य गटात शेवटच्या सहाव्या जागेसाठी रवी सुतार, दत्तात्रय थोरात, अमित जोरी या तिघानाही समान मते (२३) पडली. अखेर चिठ्ठी टाकून या जागेचा निकाल घ्यायचे ठरले त्या प्रमाणे इतर सदस्यांने सुतार यांच्या नावाची चिठ्ठी काढली व ते विजयी ठरले.

फोटो ओळ- पॉप्युलर – गिरीधर नगर सोसायटी निवडणुकीच्या वेळी जमा झालेले सोसायटी सदस्य